काँग्रेसच्या आमदारांचं क्रॉस व्होटिंग, फुटलेल्या ‘त्या’ 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले. फक्त महाविकास आघाडीचा एक उमेदवार जयंत पाटील हा पडला. मविआकडून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्यात
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि काँग्रेसची सात मतं फुटली. त्यामुळे महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झालेत आणि महाविकास आघाडीतील शेकापचे जयंत पाटील पराभूत झालेत. तर मविआची मतंही आम्हाला मिळाली असं कॅमेऱ्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर ते कबुलही केलं. पण हे फुटलेले सात आमदार नेमके कोण? हे ओळखल्याचा दावा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केला आहे. गुप्त मतदान असताना क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांना काँग्रेसने कसं ओळखलं.. याचीच चर्चा आता सुरू आहे. फुटलेल्या आमदारांना ट्रेस केलंय. आता त्यांचा कार्यक्रम होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. तर फुटलेली मतं कशी समोर आलीत बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 14, 2024 10:01 AM