झिशान सिद्दिकींचं मतं कोणाला? काँग्रेसच्या बैठकीत गैरहजेरी अन् चर्चांना उधाण
काँग्रेस बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी हे नसल्याचे दिसले. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यासंदर्भात झिशान सिद्दिकी यांनाच विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले आहे. जर मला त्यांनी बोलवलंच नाही तर मी कसं जाणार. मला त्यांनी का बोलवलं असतं तर...
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काल बैठक झाली. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी हे नसल्याचे दिसले. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यासंदर्भात झिशान सिद्दिकी यांनाच विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले आहे. जर मला त्यांनी बोलवलंच नाही तर मी कसं जाणार. मला त्यांनी का बोलवलं, मला कोणत्याही बैठकीत सहभागी का करुन घेतलं जात नाही, याचे उत्तर तर तेच देऊ शकतात. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. आजही मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाणार आहे. तिथे जाऊन मी वरिष्ठांशी चर्चा करेन. ते मला ज्यांना मतदान करायला सांगतील त्यांना मी मतदान करणार असल्याचे त्यांनी म्हटले तर कालच्या बैठकीचे कोणतेही आमंत्रण आलेले नाही. कोणत्याही नेत्याने मला फोन करुन बैठकीबद्दल कळवलेलं नाही. मला कोणाचाही फोन, मेसेज, ईमेल आलेला नाही. माझ्याबद्दल जो कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांनी मी सांगू इच्छितो की मला जर काल बोलवले असते तर मी बैठकीला गेलो असतो. मला जर आमंत्रणच मिळाले नसेल तर मी तिथे पोहोचणार कसा? असा सवालच त्यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, मला त्या बैठकीबद्दल काहीही माहिती नव्हती असे सांगत असताना मला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जे सांगतील, त्याचा मी आदर करेन असे झिशान सिद्दिकी म्हणाले.