राजकारणातील चाणाक्य नेमकं कोण? शरद पवार की अजित पवार? नागपूर विधानभवनासमोर झळकले बॅनर

| Updated on: Jul 13, 2024 | 1:34 PM

विधानपरिषद निवडणूकीत अजित पवारांनी इतर पक्षातील पाच मतं फोडल्यामुळे नागपूरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे होर्डिग्ज नागपूर येथे लावले आहेत. या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो दिसताय.

विधान परिषदेतील विजयानंतर नागपूरमध्ये अजित पवार यांचेच बॅनर झळकताना दिसताय. राजकारणातील चाणाक्य म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते मात्र विधान परिषदेतील विजयानंतर नागपूरातील विधानभवनासमोर राजकारणातील चाणक्य हे अजित पवार असल्याच्या आशयाचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणूकीत अजित पवारांनी इतर पक्षातील पाच मतं फोडल्यामुळे नागपूरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे होर्डिग्ज नागपूर येथे लावले आहेत. या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो दिसताय. तर विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांच्या दोघांचे फोटो असून त्यांचे अभिनंदन करणारे अनोखे होर्डिंग्ज सध्या लक्ष वेधून घेत आहेत.

Published on: Jul 13, 2024 01:34 PM
Igatpuri Waterfall : इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या ‘सूनकडा’चं सौंदर्य
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल सगळं काही… प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून नागपुरातील 6 विधानसभेत बॅनर