प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी राज्यात मान्सूनची एन्ट्री, उद्यापर्यंत केरळात होणार दाखल
VIDEO | मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर यंदा सरासरी किती टक्के पाऊस होणार?
मुंबई : मे महिन्यातील उन्हानं वैतागलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता नागरिकांची प्रतिक्षा संपणार आहे कारण उद्यापर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. उद्या केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होणार असल्याचं हवामान खात्यांन म्हटलं आहे. हवामान खात्याने मान्सूनच्या आगमानबाबत मोठी अपडेट दिली आहे. यंदा राज्यभर होणाऱ्या पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. तर राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ९५ टक्के पाऊस होणार आहे. यासह यंदा १० जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार यासह विदर्भासाठी आनंदाची बातमी म्हणजे विदर्भात १०० टक्के पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सून पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे IMD ने म्हटले आहे.