दोन वर्षात पहिल्यांदाच ठाकरे-फडणवीस इतक्या जवळ, दोघंही लिफ्टमध्ये एकत्र, जुनी युती ‘लिफ्ट’ होणार?

| Updated on: Jun 28, 2024 | 11:52 AM

गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच हे दोघं नेतं इतक्याजवळ आल्याचे दिसले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्ट हे निमित्त ठरलं आणि काही मिनिटांचा का असेना... ठाकरे-फडणवीसांमध्ये संवाद झाला. बघा लिफ्टजवळ नेमकं काय घडलं? लिफ्टमध्ये असताना दोघांत नेमकी काय चर्चा झाली...?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टमधून आल्याचे पाहायला मिळाले. यावरून पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच हे दोघं नेतं इतक्याजवळ आल्याचे दिसले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्ट हे निमित्त ठरलं आणि काही मिनिटांचा का असेना… ठाकरे-फडणवीसांमध्ये संवाद झाला. लिफ्ट येईपर्यंत दोघांमध्ये सभागृहाच्या कामकाजावरून हलका-फुलका संवाद झाला. तेवढ्यात लिफ्ट आली, लिफ्टमध्ये चौघेजण होते, दोघे बाहेर पडले आणि भुजबळ, दरेकर आतच राहिले. तर दरेकर यांना पाहून ठाकरेंनी याला पहिले बाहेर काढा म्हणत ठाकरेंनी चिमटा काढला. त्यावर दरेकरांनी माझं ओठावर एक आणि पोटावर एक नसतं, असं म्हणत मिश्किल टोला लगावला. बघा लिफ्टजवळ नेमकं काय घडलं? लिफ्टमध्ये असताना दोघांत नेमकी काय चर्चा झाली…?

Published on: Jun 28, 2024 11:52 AM
लोकसभा निवडणुकीत भाजपने पत्रकारांना पैसे वाटले? भाऊ तोरसेकरांच्या ‘त्या’ व्हिडीओने अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Maharashtra Rain Forecast : राज्यभरात पावसाची बॅटिंग, ‘या’ जिल्ह्याला IMD चा कोणता अलर्ट? कुठे कसा कोसळणार पाऊस?