VIDEO: Maharashtra Nagar Panchayat Election | ‘BJP नंबर वन’ पुन्हा एकदा सिद्ध झालं -Chandrakant Patil

| Updated on: Jan 19, 2022 | 3:11 PM

विचाराने एक नसताना, आचाराने एक नसताना युती करून भाजपविरोधात लढणार असाल तर त्या एकत्र लढणाऱ्यालाही भाजप पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबईः राज्यभरातील नगरपंचायतींच्या निकालावर विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ 106 नगरपंचायतींचे निकाल लागले. 7 नगरपंचायतींचे निकाल उद्या लागतील. 99 पंचायतींचे निकाल पूर्ण लागलेत. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे. नगरपंचायत स्वबळावर आणि भाजपच्या पाठिंब्याने अशा दोन्ही प्रकारे विजयी झाली आहे. त्यामुळे मी आधीपासून म्हणतोय, महाराष्ट्रात एकेकटे लढा. मग कोणाची ताकद जास्त आहे, ते बघू. विचाराने एक नसताना, आचाराने एक नसताना युती करून भाजपविरोधात लढणार असाल तर त्या एकत्र लढणाऱ्यालाही भाजप पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Published on: Jan 19, 2022 03:09 PM
VIDEO: Nagar Panchayat Election Result 2022 | नगरपंचायत निवडणुकीवर Nawab Malik यांची प्रतिक्रिया
VIDEO: Nagar Panchayat Election | रोहित पाटलांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष