VIDEO : भाषणाच्या शेवटी Nana Patekar यांच्या भन्नाट डायलॉगबाजीवर नागरिकांकडून टाळ्यांचा पाऊस

| Updated on: Jun 05, 2022 | 1:31 PM

होतंकागल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा अनावरण करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या तूफान भाषणाचीच चर्चा झाली. नाना पाटेकर, हसन मुश्रीफ आणि अजित पवार हे चांगले मित्र आहेत आणि यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली.

होतंकागल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा अनावरण करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या तूफान भाषणाचीच चर्चा झाली. नाना पाटेकर, हसन मुश्रीफ आणि अजित पवार हे चांगले मित्र आहेत आणि यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. नाना पाटेकर यांनी भाषणाच्या शेवटी भन्नाट डायलॉगबाजी केली, नानांची डायलॉगबाजी ऐकून नागरिकांकडून टाळ्यांचा पाऊस पडला. आज कोल्हापुरात पुतळ्यांचे नाही तर विचारांचे अनावरण झाले आहे. माणसं गोळा करण्यावर टॅक्स असता तर मुश्रीफ हायेस्ट टॅक्स भरणारे असते. आता मुश्रीफ जरा तुम्ही सिनेमात काम करा. मी तुमच्या कागलमधून निवडणूक लढतो. तुम्ही सांगितलं की मी आरामात निवडून येऊ शकतो. सगळे पुतळे आपल्या मनात असायला पाहिजे.

 

 

Published on: Jun 05, 2022 01:31 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 5 June 2022
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 05 June 2022