Nanded Rain | विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Sep 01, 2021 | 8:59 AM

गोदावरीच्या या प्रवाहामुळे छोट्या ओढ्या नाल्याचे पाणी तुंबण्याची भीती आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलय.

नांदेड : विष्णुपुरी बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. गोदावरी नदी पूर सदृश्य स्थितीत प्रवाहित झाल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदी पूरसदृश्य स्थितीत दुथडी भरून वाहतेय. नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमीला नदीचे पाणी भिडलंय. नदीच्या वरच्या भागात म्हणजेच परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जादा असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याचे एकूण तीन दरवाजे उघडले आहेत. गोदावरीच्या या प्रवाहामुळे छोट्या ओढ्या नाल्याचे पाणी तुंबण्याची भीती आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलय. दरम्यान, नांदेडमध्ये काल दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच होत्या.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 1 September 2021
Nalasopara Rain | मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात गुडघाभर पाणी, आचोळे रस्ता पुन्हा पाण्याखाली