‘…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले’; राज ठाकरे यांचा खोचक टोला, नक्कल करत म्हणाले…

| Updated on: Aug 16, 2023 | 4:39 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड करताच टुणकन भाजपात उडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय लगावला राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून सत्तेत गेलेल्या अजित पवार यांना खोचक टोला?

पनवेल, १८ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मुंबई गोवा महामार्गाच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी अजित पवार यांना खोचक टोला लगावताना अजित पवार यांची नक्कलही राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे म्हणाले, अजित पवार यांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले, “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे आले. कारण, छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना सांगितलं असणार. आत काय काय असतं? जाऊ नका… आपण हवं तर इथे जाऊ पण तिथे नको, असे म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला.

Published on: Aug 16, 2023 04:29 PM
‘टोलनाका फोडल्यावरून बोलणाऱ्यांनी आधी पक्ष बांधायला शिका’; राज ठाकरे यांचा भाजपला खरमरित सल्ला
बेपत्ता भाजपच्या नेत्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट, नर्मदा नदी पात्रात आढळला मृतदेह…