लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार? मनसेकडून लोकसभेसाठी ‘या’ संभाव्य उमेदवारांची यादी समोर

| Updated on: Oct 07, 2023 | 1:59 PM

VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कबंर कसली आहे. तर अनेक राजकीय पक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. अशात लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार असल्याची चर्चा होताना दिसतेय.

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा सगळीकडे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने मनसेने लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू केली आहे. आगामी लोकसभेसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार असल्याची चर्चा असून मनसेचे संभाव्य उमेदवार कोण असणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर कल्याण लोकसभा – राजू पाटील, ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ अविनाश जाधव, पुणे लोकसभा – वसंतराव मोरे, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनीताई ठाकरे, दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर, संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन, सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे, चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर आणि रायगड लोकसभा – वैभव खेडेकर या नेत्यांची नावं लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चर्चेत आहे.

Published on: Oct 07, 2023 01:59 PM