Police Bharti 2024 : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबोहर आंदोलन; एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडली, नेमकी मागणी काय?

| Updated on: Jun 20, 2024 | 3:46 PM

राज्यात कालपासून १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच २०२२ - २३ साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्याला एक संधी मिळावी यासाठी पुण्यात काही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनेक विद्यार्थी एकत्र जमले असून त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, एका आंदोलक विद्यार्थ्याची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा एका वर्षाने वाढवून द्यावे, अशी मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांची आहे. राज्यात कालपासून १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच २०२२ – २३ साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्याला एक संधी मिळावी यासाठी पुण्यात काही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच मागणी लावून धरली आहे. ती म्हणजे एकतर वयोमर्यादा वाढवा अन्यथा पोलीस भरती रद्द करा… त्यामुळे आता पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा एका वर्षाने वाढवून मिळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Jun 20, 2024 03:46 PM
Sanjay Shirsat on Sanjay Raut : मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाटांनी काढली राऊतांची औकात
दोन मंत्र्यांना तातडीने पाठवा, लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळावरून वडेट्टीवारांचा शिंदेंना फोन