Police Bharti 2024 : ना डॉक्टरी चालत, ना वकिली… कॉन्स्टेबल बनण्यासाठी कोण-कोण आलं?; राज्यात मेगा पोलीस भरती सुरू

| Updated on: Jun 19, 2024 | 12:12 PM

Maharashtra Police Recruitment 2024 आजपासून १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू होत आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर १७ हजार ४७१ पदांसाठी राज्यभरातून तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले आहे.

राज्यात आजपासून १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू होत आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर १७ हजार ४७१ पदांसाठी राज्यभरातून तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरूणाईची संख्या जास्त असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर, वकील, एमबीए आणि बी.टेक केलेले उमेदवार पोलीस भरतीच्या प्रक्रियेत उतरले आहेत. तर राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेत आपला नंबर लागावा यासाठी जीवाची बाजी लावताना दिसताय. १७ हजार ४७१ पदांमध्ये बँड्समन पदाच्या ४१ जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या १६८६ जागा, पोलीस शिपाई पदाच्या ९५९५ जागा तर शीघ्र कृती दलासाठी ४ हजार ३४९जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी जम के तयारी केली असल्याचे पाहायला मिळतेय.

Published on: Jun 19, 2024 12:07 PM
लोकं बघत राहिले, व्हिडीओ केला पण मदतीला कुणी धावलं नाही; वसईत भररस्त्यात तरुणीची निर्घृण हत्या
तुमच्या बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर… गोपीचंद पडळकरांचा कुणाला इशारा?