सस्पेन्स कायम! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, घटनापीठानं निकाल ठेवला राखून

| Updated on: Feb 16, 2023 | 2:20 PM

VIDEO | 7 जणांच्या घटनापीठाकडे प्रकरण देण्याचा सस्पेन्स कायम! निकाल ठेवला राखून...

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. कोर्टाने आता याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याचा सस्पेन्सही कायम आहे. त्यामुळे कोर्ट थेट निकाल देणार की हे प्रकरण ७ जणांच्या खंडपीठाकडे पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

Published on: Feb 16, 2023 02:20 PM
… तर मग आग्रा किल्ल्यावर शिवजयंती का साजरी करू नये; संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल
सत्तासंघर्षाची सुनावणी 7 सदस्यीय घटनापीठाकडे गेली तर निकाल किती लांबणार? काय म्हणताय घटनातज्ज्ञ उल्हास बापट?