कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूरमध्ये ‘राडा’, शिवसैनिक आणि राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आमने-सामने
एकाबाजूला राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचवेळी शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.
मुंबई: एकाबाजूला राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचवेळी शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. आधी फक्त शिवसैनिक शिंदे गटासोबत केलेल्या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करत होते. आता बंडखोर आमदारांचे समर्थक सुद्ध रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये राडा पहायला मिळाला. राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत. सध्या ते शिंदे गटासोबत गुवहाटीमध्ये आहेत.
Published on: Jun 27, 2022 01:41 PM