Breaking | वर्षा निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग, देशमुख प्रकरणावर चर्चेची शक्यता
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.