Special Report | महाराष्ट्राच्या जिंदादिल राजकीय संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्रानं नेहमीच देशासमोर अनेक वेगळे आदर्श ठेवला आहे. अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही राज्याच्या राजकारणातील एक वेगळी संस्कृती बघायला मिळाली.
मुंबईः महाराष्ट्रानं नेहमीच देशासमोर अनेक वेगळे आदर्श ठेवला आहे. अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही राज्याच्या राजकारणातील एक वेगळी संस्कृती बघायला मिळाली. इतर वेळी एकमेकांवर टीका टिप्पणी करणारे नेते लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी आपले राजकीय जोडे सगळ्यांनी बाहेर ठेऊनच आत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रा अजित पवार, गृहमंत्री दिली वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्रा उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तर भाजपचे नेते पियूष गोयल यांनी अंत्यविधीच्या ठिकाणी शरद पवार यांचा हात धरून ते घेऊन गेले आणि त्यांचे ते सारथी झाले. तर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या पायात बूट घातले, शाहरूख खानने सगळ्या नेत्यांची चौकशी करत विचारपूस केली. तर या सगळ्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत वावरत राहिले ते शिवसेनेत मिलिंद नार्वेकर. यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय संस्कृतीचे वेगळे दर्शन अख्या देशानं बघितले.