Jayant Patil यांची कंत्राटी भरतीवरून सडकून टीका, म्हणाले, ‘सरकारच कंत्राटी पद्धतीने…’
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कंत्राटी भरतीवर केले भाष्य म्हणाले, 'पैसे वाचवण्यासाठी सरकारने बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेतले तर...'
पुणे, १६ सप्टेंबर २०२३ | सरकारकडून कंत्राटी भरतीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावर शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात कंत्राटी भरतीवर मोठं भाष्य केले आहे. “सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात तिथे कंत्राटी कर्मचारी नेमणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदे कंत्राटी पद्धतीने भरली गेली तर ते अतिशय आहे. पैसे वाचवण्यासाठी सरकारने बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन त्यांच्याकडून काही कामं करुन घेतली. त्यात चुका निष्पन्न झाल्या तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो”, असं जयंत पाटील म्हणाले.
इतकेच नाही तर कंत्राटी स्वरुपाच्या नोकऱ्या कमी होणार नाहीत याची काळजी सरकारने देखील घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक असेल अशा जागी केली तर ठीक आहे. पण त्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. नाहीतर हळूहळू आपण सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला लागू. ज्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाते ते वर्ष-दीड वर्षानंतर संघटना बांधतात, त्यांची आंदोलने सुरु होतात आणि काम बाजूला राहतं, असं कंत्राटी भरतीबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केले आहे.