Pune Unlock | आजपासून पुण्यात कोरोना निर्बध शिथिल, पाहा काय सुरु, काय बंद?
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Published on: Aug 09, 2021 11:53 AM