राज्यात आजही धुव्वाधार पाऊस? हवामान खात्यानं कुठं दिला रेड अन् ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या…
VIDEO | महाराष्ट्रात आज कोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस? कोणत्या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट?
मुंबई , 28 जुलै 2023 | मागील काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यात तर होणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलाय. या दोन जिल्ह्यांना २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर ठाण्यासह रायगड, पुणे आणि रत्नागिरीली आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई शहरासह आज उपनगराला सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला होता मात्र यानंतर आता साडे आठ वाजेनंतर यलो अलर्ट असणार आहे.