Maharashtra Rain : मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा रूद्रावतार, कोणत्या भागाला झोडपलं?

| Updated on: Sep 02, 2024 | 11:02 AM

मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू देखील करण्यात आलं. यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. पुसदमध्ये कित्येक घरात पुराचं पाणी शिरलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्याने नाल्याला रौद्र रूप धारण झाले होते.

विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. नांदेड बीडसह परभणीच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तर यवतमाळ येथेही पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं यामुळे अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर काही ठिकाणी माणसं कंबरे एवढ्या पाण्यात बुडाले तर वाहनंही अर्धी पाण्यात गेली होती. या पुरात या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. यावेळी नाल्या लगतच्या एका घरात पाणी शिरले. या घरातील 3 लोक या पुरात अडकले होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी तात्काळ यंत्रणा बोलवून अडकलेल्या 3 लोकांना रेस्क्यू केले. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी शहरातील रेल्वे उड्डाण परिसरातील केमिस्ट भवनातही शिरले असून त्याचबरोबर अनेक मॉलमध्ये पाणी शिरले आहे. मॉलमध्ये पाणी शिल्याने अनेक सामान आणि धान्य पावसाच्या पाण्यात भिजलं असून काही सामान पाण्यात वाहून गेल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 02, 2024 11:02 AM
सुरतेची ‘लूट’ झाली नाही? ‘तो’ शब्द काँग्रेसने आणला, देवेंद्र फडणवीसांचा दावा वादात
गारूडी, सुपारी बहाद्दर अन् ढोंगी, बच्चू कडू-राणा दाम्पत्यांमध्ये टोकाची टीका; कोणी काय केला हल्लाबोल?