Mumbai Weather : लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार? हवामान खात्यानं काय सांगितलं?

| Updated on: Sep 12, 2024 | 11:58 AM

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस असून आज गौरी-गणपतीचं विसर्जन कऱण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कसा होणार आज पाऊस?

आज मुंबईसह राज्यभरात लाडक्या गौरी-गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. तर आज पहाटेपासून मुंबई पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात मुंबईत पावसाने विश्रांती घेत हजेरी लावली होती. गणपत्ती बाप्पाचं आगमन पावसात झालं होतं. मात्र बाप्पाला निरोप देताना पाऊस कसा पडणार याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे. आज पहाटेपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस बसणार आहे. त्यामुळे लाडक्या गौरी-गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आभाळ भरून येणार असलं तरी गणेशभक्तांची मात्र गैरसौय होणार आहे. शिवडी, परळ आणि लालबाग या भागात पावसाची रिपरिप सकाळपासूनच सुरू आहे. तर हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळताना दिसणार आहे.

Published on: Sep 12, 2024 11:58 AM
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं मोठं वक्तव्य
‘बाप आखिर बाप… विधानसभेत बापच बाजी मारणार’, आत्रामांच्या मुलीचा शरद पवार गटात प्रवेश अन् कुणी केला मोठा दावा?