Kolhapur Flood Update | ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापुरातील सध्याच्या दृद्शांचा आढावा
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील काही भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर या भागात पाणी भरलं असून, हे पाणी आता हळूहळू दसरा चौकापर्यंत भरत आहे. तर यमगर्णीजवळ हायवेवर पाणी आल्याने पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, कोयना आणि पंचगंगा या नद्यांनी पात्रं सोडली आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे