Nashik : इगतपुरीतील दारणा धरणाचे 52 दरवाजे एकाचवेळी उघडले, सतर्कतेचा इशारा, शाळेला सुट्टी जाहीर

| Updated on: Jul 12, 2022 | 10:53 AM

खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आज शक्यतो घराबाहेर पडू नये, पालक वर्गानेही विद्यार्थी घरातच सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी.

इगतपुरी, नाशिक : सध्या राज्यभर पावसाचा जोर चांगलाच (Maharashtra Rain Update) वाढतोय. अश्यात नाशकातही पावसाने (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इगतपुरीतील दारणा धरणाच्या 52 दरवाजांमधून एकाचवेळी पाणी सोडण्यात आलं आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने 52 दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले आहेत. दारणा धरणातून 14 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणा धरणातील हे पाणी गोदावरी नदीत जातं. त्यामुळे सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आज शक्यतो घराबाहेर पडू नये, पालक वर्गानेही विद्यार्थी घरातच सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

Maharashtra Rain Update, Nashik Rain

Published on: Jul 12, 2022 10:53 AM
OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
मुसळधार पाऊस! वडाळा स्टेशनला जाण्याआधी पाण्यातून जायचं…