Kasara Ghat | कसारा घाटामध्ये धुक्याची दाट चादर, रस्त्यावर पुढचे वाहनही दिसेना

| Updated on: Sep 01, 2021 | 8:46 AM

कसारा घाटामध्ये मुसळधार पावसामुळे धुक्याची दाट चादर आहे त्यामुळे पुढील वाहने सुद्धा दिसण्यात अडथळे आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना काळजी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे.

कसारा घाटामध्ये मुसळधार पावसामुळे धुक्याची दाट चादर आहे त्यामुळे पुढील वाहने सुद्धा दिसण्यात अडथळे आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना काळजी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. , 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

Parbhani Rain | परभणीत पावसाचं थैमान, स्कॉर्पिओ वाहून जाताना गावकऱ्यांनी 7 जणांना वाचवलं
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 1 September 2021