मुख्यमंत्री शिंदे अन् उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे करार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी तब्बल ७० हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी तब्बल ७० हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आला आहे. हे सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत २५ हजार कोटींचा सामंजस्य करार झाला. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिंदाल समूहासोबत ४१ हजार कोटींचा करार तर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिंदाल समूहासोबत करार करण्यात आलाय. तर जिंदाल समुहासोबत झालेल्या करारामुळे ५ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचेही सांगितले जात आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी ४ हजार कोटी रूपयांचा सामंजस्य करार झालाय.