Breaking | वेंगुर्ला नगरपरिषदेत राणेंचा ‘मविआ’ला दे धक्का, उपनगराध्यपदी भाजपचा उमेदवार विजयी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे विधाता सावंत तर भाजपच्या शितल आंगचेकर यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपच्या शितल आंगचेकर यांचा विजय झाला आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे विधाता सावंत तर भाजपच्या शितल आंगचेकर यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपच्या शितल आंगचेकर यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेसचे विधाता सावंत याना ७ मते तर भाजपच्या शितल आंगचेकर यांना १० मते मिळाली. त्यामुळे शितल आंगचेकर या
वेंगुर्ले नगरपालिकेच्या नुतन उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. या निवडीमुळे शिवसेना, काॅगेस व राष्ट्रवादी आघाडीला भाजपने धोबीपछाड दिल्याचं बोललं जात आहे.