VIDEO : Palghar ST Strike | कानाखाली मारून दाखवा, महिला कंडक्टरचा रुद्रावतार; थेट आगारप्रमुखाला चॅलेंज
पालघर आगार प्रमुखाला महिला वाहकाने “कानाखाली मारुन दाखवा” या केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पालघर आगार प्रमुखासोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे.
पालघर आगार प्रमुखाला महिला वाहकाने “कानाखाली मारुन दाखवा” या केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पालघर आगार प्रमुखासोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. एसटी वाहक ममता पालवे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पालघर आगार येथे ममता पालवे आंदोलन करत असताना पालघर आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ममता पालवे आणि नितीन चव्हाण या दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ शूट झाला होता.