तळीयेच्या लोकांना सरकार सर्वतोपरी मदत करणार : आदिती तटकरे
रायगड जिल्ह्यामध्ये कोकणासाठी एनडीआरएफचा कायमस्वरुपी कॅम्प असावा, असा प्रस्ताव देणार आहे. तळीये ग्रामस्थांना लागेल ती मदत करु, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
रायगडच्या तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तर, रायगडच्या पालकमंत्री निधी चौधरी यांनी दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत देण्यात येत असल्याचं सांगितलं. तर, केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. ज्या ठिकाणी भीती जास्त आहे असा ठिकाणांची यादी मदत व पुनर्वसन विभागाकडं दिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोकणासाठी एनडीआरएफचा कायमस्वरुपी कॅम्प असावा, असा प्रस्ताव देणार आहे. तळीये ग्रामस्थांना लागेल ती मदत करु, असं आदिती तटकरे म्हणाल्या.