मणिपुरमध्ये हिंसा भडकली, अडकलेल्या विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीस यांचा थेट फोन अन् काय दिलं आश्वासन?

| Updated on: May 07, 2023 | 2:58 PM

VIDEO | राज्य सरकारसमोर मणिपूरमधील व्यथा मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय, विद्यार्थ्यांशी संवाद साधून काय दिलं आश्वासन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकल्याचे पाहायला मिळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान, मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर सरकारशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. अशातच या विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मदत मिळावी, यासाठी आवाहन केले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेत शरद पवार यांनीही राज्य सरकारसमोर मणिपूरमधील व्यथा मांडताच ते सक्रीय झाले. तर मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना धीर देत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Published on: May 07, 2023 01:47 PM
राऊत त्यांचा पक्ष सोडणार? दुसऱ्या पक्षात जाणार? कोणाचा दावा? अजित पवारांच नाव ही घेतल! कारण काय?
‘म्हणून मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो’, उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर