काळजी घ्या… राज्यात एप्रिल, मे महिन्यात कसं असणार तापमान? हवामान विभागाचं आवाहन काय?
एप्रिल, मे आणि जून महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक तापमान असल्याने सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचं असल्याचे आवाहन पुणे हवामान विभागाचे डॉ. होसाळीकर यांनी केले आहे. दिवसा असणाऱ्या तापमानाप्रमाणे रात्रीच्याही तापमानात वाढ होण्याची शक्यता
एप्रिल, मे आणि जून महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक तापमान असणार आहे. यासह विदर्भात ४२ अंश इतकं तापमान असणार आहे. दरम्यान, या महिन्यात उष्णतेची लाट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. एप्रिल, मे आणि जून महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक तापमान असल्याने सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचं असल्याचे आवाहन पुणे हवामान विभागाचे डॉ. होसाळीकर यांनी केले आहे. दिवसा असणाऱ्या तापमानाप्रमाणे रात्रीच्याही तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. तर मातीतली आर्द्रता कमी होण्यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. असे पुण्यात पूर्वानुमान देण्यात आले आहे. सध्या दिवसाचं तापमान ४० अंशाच्यावर गेलं आहे. हे या ऋतुतलं तापमान असल्याने ४० अंशापेक्षा जास्त तापमान असतं तेव्हा काळजी घेणं गरजेचे असते असेही त्यांनी म्हटले.