पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा जपावी, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि ही परंपरा महाराष्ट्रात जपली पाहिजे, एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य
राज्य मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पापूर्वीच होणार, अशी माहिती दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि ही परंपरा महाराष्ट्रात जपली पाहिजे, एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
मातोश्रीवर काल ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची दीड तास बैठक झाली. या बैठकीत कसबा पोट निवडणुकीची चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर चिंचवड पोटनिवडणुकीवर आज भाजपची भूमिका ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर दुपारी एक वाजता चंद्रकांत पाटील दुपारी १ वाजता पिंपरी-चिंचवड पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर सिंधुदुर्गच्या कनेडीमध्ये भाजप आणि ठाकरे गटातील राड्यात आमदार वैभव नाईक यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. हातात दांडकं घेऊन अंगावर धावतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी…