महायुती सरकारचा डोळ्यांचं पारणं फेडणारा शपथविधी सोहळा, संत महंतांसह ‘या’ नेत्यांना निमंत्रण

| Updated on: Dec 05, 2024 | 12:10 PM

Maharashtra CM Oath Taking Ceremony Invitation : आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. तर शपथविधी सोहळ्याचं देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र‍िपदाची शपथ घेणार आहे. यानंतर ते महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. तर शपथविधी सोहळ्याचं देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. यासोबतच महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, पवार गट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

Published on: Dec 05, 2024 12:10 PM
Ajit Pawar : अजित पवार सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; सर्वाधिक वेळा DCM होणारे ‘दादा’ एकमेव
Sanjay Raut : ‘ती हिंमत शिंदेंमध्ये नाही, ते 100 टक्के…’, फडणवीस अन् अजितदादांना शुभेच्छा देत राऊत काय म्हणाले?