Special Report | भाजपच्या लोकसभा मतदारसंघातील समन्वयकांमुळे शिवसेनेत धुसफूस?

| Updated on: May 31, 2023 | 11:23 AM

VIDEO | शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपचे समन्वयक, या समन्वयकांमुळे शिवसेनेत धुसफूस? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १० महिन्यांचा कालावधी असला तरी लोकसभा निवडणुकीवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये जशी लोकसभेची तयारी सुरूये तशीच तयारी भाजपने सुरू केलीय. यासाठी लोकसभेच्या ४८ जागांवर भाजपने आपल्या समन्वयकांची नियुक्ती सुद्धा केल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या १३ खासदारांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या मतदारसंघात अमित साटम हे भाजपचे समन्वयक आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात प्रसाद लाड, कल्याण येथे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत तेथे रवींद्र चव्हण, हिंगोली येथे हेमंत पाटील खासदार आहेत तेथे रामराव वडकुते, प्रतापराव जाधव बुलढाणा खासदार येथे संजय कुटे भाजपचे समन्वयक आहेत. रामटेक-कृपाल तुमाने येथे अरविंद गजभिये, वाशिम यवतमाळ-भावना गवळी येथे मदन येरावार, मावळ येथे श्रीरंग बारणे येथे संजय भेगडे, कोल्हापूर – संजय मंडलिक येथे धनंजय महाडिक, हातकणंगले- धैर्यशील माने येथे सुरेश हळवणकर, शिर्डी- सदाशिव लोखंडे येथे राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक – हेमंत गोडसे येथे देवायनी फरांदे, तर पालघर येथे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. याठिकाणी भाजपचे संजय केळकर आणि नरेंद्र पवार या भाजप नेत्यांवर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 31, 2023 11:23 AM
“एक वेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसू, पण भाजपासोबत…”, नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राष्ट्रवादी आक्रमक, शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला अन् आयुक्तालयासमोर आंदोलन; काय आहे कारण?