अमोल मिटकरींचा विधान परिषद निवडणुकीवरून गौप्यस्फोट

| Updated on: Jun 19, 2022 | 2:03 PM

भाजपच्या चारही मुंड्या चित करण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. उलट भाजपचीची दोन मतं महाविकास आघाडीला मिळणार आहेत, त्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत वाट बघा, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.

तीन पक्षांच्या तीन्ही पक्षश्रेष्ठींनी काल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सर्व आपल्या आमदारांची बैठक घेतली. राज्यसभेमध्ये जी चूक झाली ती चूक आता विधान परिषदेसाठी होऊ नये अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. ज्या ज्या वेळी पक्षप्रमुखांनी मिटींग घेतली असेल तेव्हा त्या त्या पक्षाच्या आमदारांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली असेल. मात्र आज शिवसेनेचा वर्धापन दिनसुद्धा आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपच्या चारही मुंड्या चित करण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. उलट भाजपचीची दोन मतं महाविकास आघाडीला मिळणार आहेत, त्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत वाट बघा, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.

Published on: Jun 19, 2022 02:03 PM
अग्निपथ योजना हा केंद्र सरकारचा मूर्खपणा- संजय राऊत
Spice jet emergency landing: स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग; उड्डाणावेळी इंजिनमध्ये लागली आग