मंत्रालय परिसरात महाविकास आघाडीचं धरणं आंदोलन
तसेच भाजपमधील अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली होती, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपने सुडाचं राजकारण करीत नवाब मलिका अटक केल्याने आज महाविकास आघाडीतील अनेक नेते अटकेच्या निषेधार्थ मुंबईतील मंत्रालया शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे अनेक नेते मुंबई दाखल झाले असून दहा वाजल्यापासून ते धरण आंदोलन करणार आहेत. काल अनेक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी भाजप ईडीचा वापर चुकीच्या पध्दतीने करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपमधील अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली होती, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.