विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, अजित दादांच्या यादीत कोणाची नावं?

| Updated on: Sep 14, 2024 | 10:24 AM

महायुतीची 100 जागांची यादी तयार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर, 100 जागांची यादी महायुतीकडून जारी केली जाणार आहे. ज्यामध्ये, भाजपचे 50 उमेदवार, शिंदेंच्या शिवसेनेचे 25 उमेदवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवारांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे. महायुतीची 100 जणांची यादी तयार असून अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चाही सुरु झाली आहे. आतापर्यंत, जागा वाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3-4 बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले आहेत. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही, तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित दादाच लढणार असल्याची माहिती आहे. या 25 उमेदवारांमध्ये
बारामतीतून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, परळी धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, रायगडमधून पुन्हा एकदा अदिती तटकरे, अहमदनगमधून संग्राम जगताप, खेडमधून दिलीप मोहिते पाटील संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे, उदगीर- संजय बनसोडे, पुसद इंद्रनील नाईक, वाईतून मकरंद आबा पाटील, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनिल शेळके, अमळनेरमधून अनिल पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीतून सुनिल टिंगरे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत.

Published on: Sep 14, 2024 10:24 AM