अजितदादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून हेलिकॉप्टरने एबी फॉर्म, कोणकोणत्या मतदारसंघात रंगली दोस्तीत कुस्ती?

| Updated on: Oct 31, 2024 | 11:03 AM

महाविकास आघाडी आणि महायुती हे एकमेकांच्या आमने-सामने असली तरी काही जागांवर मात्र महाविकास आघाडीतील उमेदवाराला महाविकास आघाडीतूनच तर महायुतीतील उमेदवाराला महायुतीतूनच आव्हान मिळालं आहे.

Follow us on

महायुतीत मानखुर्द-शिवाजीनगर या जागेवर दादा गटाकडून नवाब मलिक आणि शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांच्यात लढत होणार आहे. बीडच्या आष्टी या मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस तर दादा गटाकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोर्शी या मतदारसंघातून भाजपच्या उमेश यावलकर विरोधात अजित पवार गटाच्या देवेंद्र भुयार यांना तिकीट देण्यात आलंय. दिंडोरी विधानसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ तर त्यांच्या विरोधात शिंदे गट शिवसेनेचे धनराज महाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. देवळाली, सिंदखेडराजा, पुरंदर या मतदारसंघात देखील महायुतीतील पक्षच एकमेकांच्या आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहितीनुसार काल उशिरापर्यंत महायुतीतून दिंडोरी आणि देवळाली या मतदारसंघातून अजित पवार गटाचेच उमेदवार निश्चित होते मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने दिंडोरी आणि देवळाली या मतदारसंघात आपल्या उमेदवारांना अजित पवार विरोधात लढण्यासाठी फॉर्म पाठवले आणि त्यांनी ते भरले. तर महाविकास आघाडीमध्येही काही जागांवर दोस्तीत कुस्ती रंगल्याचे पाहायला मिळाले.