Chhagan Bhujbal : … तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, छगन भुजबळ भरसभेतून नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 06, 2024 | 5:45 PM

महायुतीचे उमेदवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. नाशिक जिल्ह्यातील खेडलेझुंगे गावातून छगन भुजबळांनी आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला.

नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार आहे. आज छगन भुजबळांनी प्रचाराचा शुभारंभ करताना श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केलाय. येवल्यात बोलत असताना छगन भुजबळांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ‘हिंदू धर्मात विद्येची देवता सरस्वती पण मुलींना शिक्षण द्यायचं नाही. शैर्याची देवता आई भवानी पण काही झालं तर बायकोला म्हणायचं तू आत थांब मी बोलतो. संपत्तीची देवता लक्ष्मी पण घरच्या लक्ष्मीच्या हातात १० रूपये सुद्धा देत नाही. या सर्व देवी देवतांना आपण पूजतो. त्या महिला आहेत. पण काही ठिकाणी महिलांशी कसं वागलं जातं…’, असे म्हणत छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. छगन भुजबळ म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितपणे पैशांची अडचण निर्माण होणार पण आम्ही तो पैसा निर्माण केला. आणि १५०० रूपये लाभार्थी महिलांना देऊन लाडकी बहीण योजना सुरू केली. आज राज्यात २ कोटींहून अधिक महिलांना हे पैसे पोहोचलेत. पण विरोधत म्हणताय, आम्ही आलो की योजना बंद करू, असे म्हणत असताना छगन भुजबळांनी विरोधकांवरच टोला लगावत तुम्ही सत्तेत येणार नसल्याचे भाष्य केले. तर विरोधक म्हणतात आम्ही आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करू. आम्ही पुन्हा निवडून येणार आहोत. मंत्रिमंडळात आम्ही असणारच असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले जर ही योजना आम्ही सुरू ठेवली नाहीतर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील.

Published on: Nov 06, 2024 05:45 PM
Sadabhau Khot : ‘आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा…’, शरद पवारांच्या आजारावरून सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मराठवाड्यातील सभेतून मनोज जरांगे पाटलांना सवाल, ‘आरक्षण कसं मिळेल?’