नाशिक शिक्षक निवडणुकीत महायुतीचे किशोर दराडे आघाडीवर, पण ‘इतक्या’ मतांची आवश्यकता
पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. तर बाद फेरीतीली मतमोजणीमध्ये आतापर्यंत १८ उमेदवार बाद आहेत. नाशिक शिक्षक निवडणुकीत विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विजय मिळवण्यासाठी किशोर दराडेंना किती मतांची गरज?
नाशिक शिक्षक निवडणुकीसंदर्भातील बातमी समोर येत आहे. नाशिक शिक्षक निवडणुकीत सध्या दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. तर शिक्षक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी किशोर दराडेंना दुसऱ्या पसंतीचे ५ हजार १०० मतं असणं आवश्यक आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. तर बाद फेरीतीली मतमोजणीमध्ये आतापर्यंत १८ उमेदवार बाद आहेत. नाशिक शिक्षक निवडणुकीत विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांची शिक्षक निवडणुकीत विजयाकडे वाटचाल सुरू असताना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे गणित मात्र बिघडवलं आहे.
Published on: Jul 02, 2024 11:25 AM