Maharashtra Cabinet : नाही मिळाला लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?

| Updated on: Dec 17, 2024 | 12:30 PM

नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. हे नाराज असलेले आमदार राज्यातील विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सोडून आपल्या गावी, मतदारसंघात परतले आहेत.

नुकताच नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. हे नाराज असलेले आमदार राज्यातील विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सोडून आपल्या गावी, मतदारसंघात परतले आहेत. छगन भुजबळ हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजर राहिलेत. मात्र मंत्रिपदाचा पत्ता कट होताच ते आपल्या नाशिक येवला या मतदारसंघात परतले आहेत. तानाजी सावंत यांना देखील यंदा मंत्रिपदाची आशा होती. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचाही नंबर न लागल्याने ते सुद्धा हिवाळी अधिवेशन सोडून पुण्यात परतले आहेत. तर माजलगावचे प्रकाश सोळुंके यांना देखील मंत्रिपदाची आस होती. मात्र त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते बीड जिल्ह्यात परतलले आहेत. यासोबतच आमरावतीच्या रवी राणा यांनी यंदा मंत्री होण्याचा संकल्प धरला होता. मात्र मित्र पक्षात कोणालाही जागा न मिळाल्याने ते सुद्धा बॅग पॅक करून अमरावतीत परतले आहेत.

Published on: Dec 17, 2024 12:30 PM
Sushma Andhare : 6 फूट उंच, गोल गंध, ‘जय श्रीराम’च्या घोषणा अन् जीवाला धोका, रात्री 3.30 वाजता नागपूरात सुषमा अंधारेंसोबत काय झालं?
Uday Samant : ‘…तर एकनाथ शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात’, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य