ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महायुती आघाडीवर, ३२६ पैकी किती जागा मिळाल्या महायुतीला?
राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या मतदानाचे निकाल आज समोर येत आहे. यावरून कुठं कोणाचं वर्चस्व हे स्पष्ट होणार आहे. महायुतीमधील सर्वात नंबर एकला अजित पवार गट आणि भाजपमध्ये चुरशीची लढत. बघा भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा कुठे कुणाचा विजय
मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या मतदानाचे निकाल आज समोर येत आहे. यावरून कुठं कोणाचं वर्चस्व हे स्पष्ट होणार आहे. इतकंच नाहीतर विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार, याकडे नेत्यांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निकालात महायुती सर्वात पुढे असून आघाडीवर आहे. राज्यातील ३२६ ग्रामपंचायतींपैकी २०४ ग्रामपंचायती या महायुतीकडे आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या निकालात महायुतीच्या तिनही पक्षांनी आता आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर या महायुतीमधील सर्वात नंबर एकला अजित पवार गट आणि भाजप या पक्षात चुरशीची लढत होताना दिसतंय. बघा भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा कुठे कुणाचा विजय झाला.
Published on: Nov 06, 2023 11:20 AM