Mahayuti Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहिणीं’सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, बघा काय आहे खास?

| Updated on: Nov 10, 2024 | 4:02 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपच्या जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहिणीं’सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा कऱण्यात आल्यात. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. भाजपच्या या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यामध्ये रोजगार, व्यवसाय यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासह भाजपने आपल्या संकल्पपत्रात महिलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यात राज्यातील सर्व महिलांना सुरक्षेची, सन्मानाची आणि संधीची समानता सुनिश्चित केली जाणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार, महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार, प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार, वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Published on: Nov 10, 2024 04:02 PM