खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरु, कोणत्या जिल्ह्यात कोणा-कोणात स्पर्धा?

| Updated on: Dec 22, 2024 | 12:36 PM

सरकार आल्यानंतर 26 दिवस उलटून गेल्यानतंर महायुतीचं खातेवाटप कधी जाहीर होणार? याची उत्सुकता असताना महायुतीचं खातेवाटपही नुकतंच पार पडलं. मात्र आता राज्यातील काही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता

महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळासाठी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. मात्र सरकार आल्यानंतर 26 दिवस उलटून गेल्यानतंर महायुतीचं खातेवाटप कधी जाहीर होणार? याची उत्सुकता असताना महायुतीचं खातेवाटपही नुकतंच पार पडलं. मात्र आता राज्यातील काही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळतेय. तर बीड जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पालकमंत्री होणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे पालकमंत्री होणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Dec 22, 2024 12:36 PM