Aaditya Thackeray VIideo : दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री आक्रमक पण महायुतीचे ‘हे’ 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?

| Updated on: Mar 21, 2025 | 10:26 AM

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर सत्ताधारी मंत्री आक्रमक झालेत. मात्र महायुतीच्याच तीन आमदारांची वक्तव्ये आदित्य ठाकरेंच्या समर्थनात असल्याचं दिसत आहे.

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या अटक यांची मागणी करतायत. पण त्याच वेळी सत्तेतल्या तीन तीन आमदारांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतल्याचं दिसत आहे. सीआयडीच्या तपासात आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही हे स्पष्ट झालं असून आदित्य ठाकरेंचं काही होणार नाही असं शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. दिशाचा मृत्यू पाच वर्षांआधी 8 जून 2020 ला झाला. तीन वर्षां आधी दिशाच्या आईवडिलांनी पत्रकार परिषद घेत दिशा कामामुळे तणावामध्ये होती नेते मंडळी बदनाम करत आहेत असं म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियन अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांत सिंह वांद्र्यात तर दिशा सालियन मलाडमध्ये राहायची. 8 जून 2020 ला दिशा सालियनचा चौदाव्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. तर 6 दिवसातच 14 जून 2020 ला सुशांत सिंहने गळफास घेत आत्महत्या केली. ऑगस्ट 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी दिशाचा अपघाती मृत्यू म्हणून क्लोजर रिपोर्ट सादर केला. 8 जूनच्या रात्री पार्टीत दिशा सालियन सोबत विपरीत घटना घडल्याचा नितेश राणे यांचा आरोप आहे. पार्टीतील घटना दिशानं सुशांतला सांगितली आणि सुशांतने रिया चक्रवर्तीला सांगितल्याचं नितेश राणे यांचं म्हणणं आहे. 8 जूनच्या रात्री मृत्यूआधी एकाच नंबरवर दिशानं 40 कॉल केल्याचाही आरोप झाला. सरकार बदल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले त्याचा अहवाल अद्याप आलेला नाहीये. पण दिशाचा मृत्यू झाल्यापासूनच नारायण राणे आणि नितेश राणे यांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप करत तिची हत्या झाल्याचा आरोप केला. आता 8 जूनच्या रात्री आदित्य ठाकरे नेमके कुठे होते असा थेट सवाल नितेश राणे यांनी केलाय.

Published on: Mar 21, 2025 10:26 AM
Pune Crime : हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात; पगाराचे पैसे दिले नाही म्हणून जाळली ट्रॅव्हल बस..
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन? हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल, फहीम खानसह आणखी एक मास्टरमाईंड समोर