माहिममधून शिंदेंच्या सदा सरवणकरांची उमेदवारी रद्द होणार? अमित ठाकरेंना महायुती पाठिंबा देणार, पण…

| Updated on: Oct 27, 2024 | 11:20 AM

माहिममधून अमित ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी मिळाली. पण महायुतीने त्यांना पाठिंबा द्यावा असे आशिष शेलार म्हणाले. मात्र माघार घेण्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्टपणे नकार दिलाय.

माहिमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आला आहे. आपल्याच घरातील मुलगा निवडणूक लढवत असेल तर महायुतीने त्याला पाठिंबा देऊन का निवडून आणू नये, असं आशिष शेलार म्हणाले. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाच ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी मनसेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. माहीममध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा अमित ठाकरेंचा प्रस्ताव आहे. पण एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेणार का? हा प्रश्न आहे. तर शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिवडीची जागा भाजपकडे असून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत प्रचारही केला होता. त्याचीच परतफेड म्हणून माहिमसह शिवडीमध्ये मदत करण्याची रणनिती भाजपची दिसतेय. मात्र माहिममध्ये सदा सरवणकर यांची उमेदवारी रद्द करण्याच्या मूडमध्ये शिंदेंची शिवसेना दिसत नाहीये.

Published on: Oct 27, 2024 11:20 AM