सदा सरवणकरांच्या ‘धनुष्यबाणा’ला अमित ठाकरेंचा आधार, मतदानापूर्वी दोघं आमने-सामने अन्…, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Nov 20, 2024 | 12:46 PM

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात आहेत.

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं असून राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. अशातच आज मतदानापूर्वी मुंबईतील माहिम मतदारसंघातील दोन उमेदवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. माहिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. दरम्यान, अमित ठाकरे हे मतदान करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शनासाठी गेले असता त्यांच्यासमोर सदा सरवणकर हे आलेत. त्यांनी दोघांनी हात मिळवत एकमेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सदा सरवणकरांच्या जॅकेटवरचा धनुष्यबाण उलटा झाला होता. त्याला अमित ठाकरेंनी हाताचा आधार देत सरळ केला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतेय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Published on: Nov 20, 2024 12:46 PM
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथे कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन काय?
‘तुझा मर्डर फिक्स…’, सुहास कांदेंची समीर भुजबळांना उघड धमकी, नांदगाव मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा