Mahim Election Result 2024 : माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?

| Updated on: Nov 23, 2024 | 9:12 AM

Mahim Election Result 2024 : माहिममध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून महेश सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत यंदा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.

माहिममध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे उमेदवार अमित ठाकरे हे आघाडीवर आहेत. माहिममध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून महेश सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत यंदा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघ. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ते विजयाचा गुलाल उधणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेच्या विरोधात महायुतीने कोणताही उमेदवार न देता पाठिंबा दर्शवावा अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाहीतर महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला ही जागा देण्यात आली आणि अमित ठाकरेंविरोधात शिंदे गट शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे अमित ठाकरेंसमोर सदा सरवणकरांचे तगडे आव्हान होते. आता नेमकं बाजी कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Nov 23, 2024 09:06 AM
Worli Election Result 2024 : वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
Yevla Election Result 2024 : छगन भुजबळ यांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात विजयाचा गुलाल कोणाचा?