डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट; काचांचा खच अन् परिसरात धुराचे मोठाले लोट
डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीतील आजूबाजूच्या परिसरात धुरांचे मोठाले लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल...परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण...
आज गुरूवारी डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीतील आजूबाजूच्या परिसरात धुरांचे मोठाले लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्यात. अग्नीशमन दलाकडून एमआयडीसीमधील फेज २ मध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठी आग भडकली या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु सहा ते सात कामगार जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. एमआयडीसीमधील फेज २ मध्ये आग लागल्याची माहिती कळताच परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी धावाधाव सुरू केली. तर या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला असून कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या आहेत. त्यामुळे काचांचा खच देखील पाहायला मिळतोय.