जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर सुषमा अंधारेही अडचणीत, गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
मालेगाव येथील अमन परदेशीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. यावरून भा. द. वि. कलम 295(अ) नुसार अंधारेंवर गुन्हा दाखल झालाय.
नाशिक, ४ जानेवारी २०२४ : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावात त्यांच्यावर मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालेगाव येथील अमन परदेशीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. यावरून भा. द. वि. कलम 295(अ) नुसार अंधारेंवर गुन्हा दाखल झालाय. एका खाजगी वाहिनीच्या मुलाखतीत हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी मुद्दाम हिन दर्जाचे अश्लील शब्द प्रयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, ललित पाटील ड्रग्स प्रकरणात तडजोडीसाठी मंत्री दादा भुसे यांनी तडजोडीसाठी अमन परदेशी याच तरुणाचे नाव सुषमा अंधारे यांनी सभेतील भाषणात घेतले होते. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह उपनेते अद्वय हिरे जेलमध्ये आहेत तर संजय राऊत पाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.