चंदा दो धंदा लो, हा खेळ… संजय राऊतांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप
श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राऊतांनी तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याबाबत संजय राऊत यांनी मोदींना पत्र लिहीलं असून त्यासंदर्भात एक ट्वीट करून गंभीर असे आरोपही केले
उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याबाबत संजय राऊत यांनी मोदींना पत्र लिहीलं असून त्यासंदर्भात एक ट्वीट करून गंभीर असे आरोपही केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्त्रोत काय? फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? असा सवाल करत ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली. पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी दखल घेतली नसल्याचा आरापेही राऊतांनी केलाय.